‘भारत चावल’ बाजारात

‘भारत चावल’ बाजारात

नवी दिल्ली, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : सामान्यांना महागाईचा फटका बसू नये यासाठी केंद्र सरकारने ‘भारत चावल’ या नावाने तांदूळ विक्रीसाठी बाजारात आणला आहे. हा तांदूळ पाच आणि दहा किलोच्या पाकिटांमध्ये उपलब्ध आहे. भारत चावल हा तांदूळ २९ रुपये प्रति किलो या दराने विकला जाणार आहे. नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय गोदामांच्या किरकोळ विक्री केंद्रांवर तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ‘भारत चावल’ उपलब्ध आहे. सध्या बाजारात पाच लाख टन ‘भारत चावल’ विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरच आणखी ‘भारत चावल’ विक्रीसाठी बाजारात येणार आहे. ‘भारत आटा’ आणि ‘भारत दाल’ प्रमाणेच ‘भारत चावल’ हे केंद्र सरकारचे उत्पादन लवकरच लोकप्रिय होईल, असा विश्वास सरकारी यंत्रणेने व्यक्त केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version