पालिकेचा निवृत्त अधिकारीच निघाला पाणीचोर

पालिकेचा निवृत्त अधिकारीच निघाला पाणीचोर

मुंबई, ०६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या जल कामे खात्यातील निवृत्त अधिकाऱ्याकडून पाणी चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. बोरिवली पश्चिमेकडील गोराई परिसरात पालिका अधिकाऱ्याचा बंगला असून या बंगल्यासाठी निवृत्त अधिकाऱ्याने चार कनेक्शन चोरी करून वापरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भाग्यवंत लाटे असं त्या निवृत्त अधिकाऱ्याचं नाव आहे. सीसी रोड कामासाठी रस्ता खोदला जात असताना हा प्रकार सुरु झाल्याचे समजले आहे. गोराईच्या माजी नगरसेविका श्वेता कोरगावकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

  • पालिकेचा निवृत्त अधिकारीच निघाला पाणीचोर
  • गोराई परिसरात भाग्यवंत लाटे यांचा कारनामा
  • सीसी रोडचे काम करताना प्रकार उघडकीस
  • माजी नगरसेविका कोरगावकर यांची पोलीस ठाण्यात तक्रार

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version