‘ओबीसींचे नेतेच मूर्ख बनवत आहेत’

‘ओबीसींचे नेतेच मूर्ख बनवत आहेत’

मुंबई, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : आरक्षणाच्या मुद्यावर ओबीसींचे नेतेच समाजाला मूर्ख बनवत आहेत, या शब्दात हरिभाऊ राठोड यांनी कोणाचेही नाव न घेता राज्य शासनाचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना लक्ष्य केले. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाज मुंबईत आंदोलनासाठी येत होता. हे आंदोलन टाळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी नवी मुंबईत पोहोचलेल्या जरांगेंची भेट घेतली आणि एका अधिसूचनेची प्रत त्यांच्या हाती दिली. यानंतर आंदोलक माघारी गेले. पण अधिसूचनेच्या मुद्यावरून भुजबळांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर भुजबळ ओबीसींचा मुद्दा घेऊन राज्य शासनापेक्षा वेगळी राजकीय भूमिका घेणार अशी चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर हरिभाऊ राठोड यांनी कोणाचेही नाव न घेता भुजबळ आणि तायवाडेंवर निशाणा साधला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version