ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू

वाराणसी, १ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : ज्ञानवापी परिसरातील एका तळघरात आढळलेल्या मूर्तींची पूजा सुरू करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर बुधवारच्या रात्रीपासूनच ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरू झाली आहे. या पूजेविरोधात मुसलमानांनी वाराणसी जिल्हा न्यायालयात दाद मागितली आहे. बाजू मांडण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत मिळावी अशी विनंती मुसलमानांनी वाराणसी जिल्हा न्यायालयाकडे केली आहे. तर ज्ञानवापीमध्ये असलेल्या सर्व तळघरांची तपासणी करावी आणि जिथे हिंदू देवतांच्या मूर्ती आढळतील अशा सर्व ठिकाणी पूजा सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही पुढे येऊ लागली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version