अनिश दयाल सिंग सीआरपीएफ तर नीना सिंग सीआयएसएफ प्रमुख

अनिश दयाल सिंग सीआरपीएफ तर नीना सिंग सीआयएसएफ प्रमुख

नवी दिल्ली, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अनिश दयाल सिंग यांची सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. तसेच नीना सिंग यांची सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे.

अनिश यांनी दीर्घकाळ इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम केले आहे. ते १९८८ च्या बॅचचे मणिपूर कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. एस. एल. थोसेन ३० नोव्हेंबर २०२३ रोजी निवृत्त झाले. थोसेन यांच्या निवृत्तीनंतर अनिश दयाल सिंग यांच्याकडे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रमुखपदाचा हंगामी कार्यभार सोवपवण्यात आला होता. ते भारत – तिबेट पोलीस दलाचे प्रमुख असतानाच ही अतिरिक्त जबाबदारी सांभाळत होते. आता त्यांचीच या पदावर नियुक्ती झाली आहे. ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत म्हणजेच निवृत्त होईपर्यंत या पदावर काम करतील. केंद्र सरकारच्या आदेशानुसार अनिश दयाल सिंग हे केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस महासंचालक म्हणून काम करणार आहेत.

नीना सिंग या १९८९ च्या बॅचच्या राजस्थान कॅडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. केंद्र सरकारच्या आदेशानुसार नीना सिंग या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक म्हणून काम करणार आहेत. नीना सिंग या मूळच्या बिहारच्या आहेत. त्यांनी पाटणा महिला महाविद्यालयातून महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केले. नंतर जेएनयू आणि हार्वर्डमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. नीना सिंग या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालक झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

इंटेलिजन्स ब्युरो अर्थात आयबीमधील विशेष संचालक राहुल रसगोत्रा ​​हे नवीन भारत – तिबेट पोलीस दलाचे प्रमुख म्हणून अनिश दयाल सिंग यांची जागा घेतील. केंद्र सरकारच्या आदेशानुसार मणिपूर कॅडरचे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी राहुल रसगोत्रा ​​हे ३० सप्टेंबर २०२५ म्हणजेच निवृत्त होईपर्यंत या पदावर काम करतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version