ज्येष्ठ अभिनेते विजयकांत यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते विजयकांत यांचं निधन

चेन्नई, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अभिनेता आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम चे प्रमुख कॅप्टन विजयकांत यांनी गुरुवारी चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. विजयकांत यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह झाली. त्यानंतर ते व्हेंटिलेटरी सपोर्टवर होते. पण दुर्देवाने गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

हॉस्पिटलने अधिकृत निवेदनात नमूद केले आहे की, “कॅप्टन विजयकांत यांना न्यूमोनियासाठी दाखल केल्यानंतर ते व्हेंटिलेटरी सपोर्टवर होते. वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या अथक प्रयत्नांनंतरही, २८ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी त्यांचे निधन झाले.”

विजयकांत तामिळनाडूमधील राजकारण आणि मनोरंजन उद्योगातील एक प्रतिष्ठित आणि आदरणीय व्यक्तीमत्त. त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांनी राजकीय – मनोरंजन क्षेत्रात समृद्ध वारसा मागे सोडलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version