चहर आणि शमी नाही खेळणार

चहर आणि शमी नाही खेळणार

नवी दिल्ली, १६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असलेला भारतीय संघ रविवारपासून एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. याआधी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी – २० सामन्यांची मालिका झाली. ही मालिका बरोबरीत सुटली. आता रविवारपासून सुरू होत असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून दीपक चहर स्वतःच बाहेर पडला आहे. वडील आजारी असल्यामुळे तो याआधी टी – २० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत आला नव्हता. वडिलांची तब्येत अद्याप गंभीर असल्यामुळे त्याने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून आधीच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची घोट्याची दुखापत अद्याप बरी झालेली नाही. यामुळे शमी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही. दोन गुणी खेळाडूंच्या गैरहजेरीत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. विश्रांती मिळावी यासाठी टी – २० प्रमाणेच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार नाही. मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत संधी मिळाली आहे.

रविवार १७ डिसेंबर २०२३ – पहिला एकदिवसीय सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग
मंगळवार १९ डिसेंबर २०२३ – दुसरा एकदिवसीय सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ
गुरुवार २१ डिसेंबर २०२३ – तिसरा एकदिवसीय सामना, बोलंड पार्क, पार्ल

मंगळवार २६ डिसेंबर २०२३ ते शनिवार ३० डिसेंबर २०२३ – पहिला कसोटी सामना, सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
बुधवार ३ जानेवारी २०२४ ते रविवार ७ जानेवारी २०२४ – दुसरा कसोटी सामना, न्यूलँड्स, केप टाऊन

एकदिवसीय : केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, रजत पाटीदार, साई सुदर्शन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, आवेश खान, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, मुकेश कुमार.

कसोटी : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, ईशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्ण, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, टी – २० मालिका
रविवार १० डिसेंबर २०२३ – पहिला टी – २० सामना, किंग्समीड, डर्बन – पावसामुळे रद्द
मंगळवार १२ डिसेंबर २०२३ – दुसरा टी – २० सामना, सेंट जॉर्ज पार्क, पोर्ट एलिझाबेथ – दक्षिण आफ्रिकेचा ५ गडी राखून विजय (डकवर्थ लुईसनुसार)
गुरुवार १४ डिसेंबर २०२३ – तिसरा टी – २० सामना, न्यू वाँडर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग – भारताचा १०६ धावांनी विजय

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version