जयपूर, १२ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपाने भाकरी फिरवली. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तिन्ही राज्यात भाजपाने मुख्यमंत्रिपदी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. विधानसभांच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने तिन्ही राज्यात नव्या चेहऱ्यांना मुख्यमंत्री केले. छत्तीसगडमध्ये भाजपाने आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विष्णू देव साय यांना मुख्यमंत्री केले. मध्य प्रदेशमध्ये भाजपाने ओबीसी समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मोहन यादव यांना मुख्यमंत्री केले. राजस्थानमध्ये भाजपाने ब्राह्मण समाजाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले.
राजस्थानचे नवे मुख्यमंत्री : भजनलाल शर्मा, सांगानेरचे आमदार
उपमुख्यमंत्री : दिया कुमारी, विद्याधर नगरच्या आमदार
उपमुख्यमंत्री : प्रेमचंद बैरवा, दूदूचे आमदार
विधानसभाध्यक्ष : वासुदेव देवनानी, अजमेर उत्तरचे आमदार
भजनलाल शर्मा
१. भाजपाचे ४ वेळा संघटनमंत्री, सध्याचे महामंत्री
२. गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे
३. भरतपूरचे रहिवासी
४. जयपूरमधील सांगानेरमधून पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली आणि विजयी झाले
भजनलाल शर्मा
एकूण संपत्ती दीड कोटी रुपये
४६ लाखांचे कर्ज
पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे
राज्य – जुने मुख्यमंत्री – नवे मुख्यमंत्री
छत्तीसगड – रमणसिंह – विष्णू देव साय
मध्य प्रदेश – शिवराजसिंह चौहान – मोहन यादव
राजस्थान – वसुंधरा राजे – भजनलाल शर्मा
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.