शाहरूख खान, अक्षय कुमार, अजय देवगणला केंद्राची नोटीस

शाहरूख खान, अक्षय कुमार, अजय देवगणला केंद्राची नोटीस

मुंबई, १० डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : एका गुटखा कंपनीच्या जाहिरातीप्रकरणी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांना केंद्र सरकारने जाब विचारला आहे. नोटीस बजावून जाब विचारण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयात आणि लखनऊच्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. केंद्र सरकारने लखनऊच्या उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना स्वतःची बाजू मांडली. यावेळी सरकारच्या बाजूने केलेल्या कारवाईची माहिती देताना नोटीस बजावल्याचे सांगण्यात आले. उच्च न्यायालयात पुढील सुनावणी ९ मे २०२४ रोजी आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू असल्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणी थांबवावी आणि इथे आतापर्यंत झालेल्या कामकाजाची माहिती सर्वोच्च न्यायालयाला द्यावी, अशीही विनंती केंद्र सरकारने लखनऊच्या उच्च न्यायालयाकडे केली आहे. उच्च न्यायालयाने अद्याप या प्रकरणी निर्णय दिलेला नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version