‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रणवीर सिंहचा सन्मान

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये रणवीर सिंहचा सन्मान

मुंबई , २ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहला नुकतेच ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये गौरवण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कारगिरीबद्दल त्याला हॉलिवूड आयकॉन शेरॉन स्टोन यांच्याकडून पुरस्कार मिळाला. यावेळी रणवीरने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचे कौतुक केले आणि त्याच्यावरील प्रेम व्यक्त केले. इतकंच नाही तर रणवीरने जॉनी डेपला अभिनय क्षेत्रातील आदर्श देखील म्हटलं.

‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये पुरस्कार स्वीकारल्यानंतर आनंद व्यक्त करताना रणवीर म्हणाला की,” एडवर्ड सिझरहँड्स आणि व्हॉट्स इटिंग गिल्बर्ट ग्रेप नंतर, मी फक्त जॉनी सरांच्या कार्याने प्रेरित झालो. आज त्यांच्या समोर पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. तुम्ही मला नकळत खूप काही शिकवलं. खूप खूप धन्यवाद सर.”K;/

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version