मोठ्ठ्या ताई ऐका हिऱ्यांची कहाणी

मोठ्ठ्या ताई ऐका हिऱ्यांची कहाणी

मुंबई, २७ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : सुप्रिया सुळे यांनी मुंबईतला हिऱ्यांचा व्यापार गुजरातला जात असल्याची टीका केली. या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजपाच्या चित्रा वाघ यांनी एक ट्वीट केले. सूरत हे हिरे निर्मितीचे अर्थात हिऱ्यांना पैलू पाडण्याचे तर मुंबई हे हिरे निर्यातीचे मोठे केंद्र आहे, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

कंत्राटी भरतीच्या मुद्यावर देवेंद्र फडणवीस यांनी बुरखा फाडल्यानंतर काही तरी विद्वेष पसरवण्याचा महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात असल्याचा कांगावा सुरू आहे. प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महापेत २० एकर जागेवर आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्कसाठी पाच एफएसआय, वीजदरात सवलत, जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय फडणवीस यांनी घेतले आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या. मलबार गोल्डने महाराष्ट्रात १७०० कोटींची गुंतवणूक केली आहे. तनिष्क हिऱ्यांच्या उद्योगात गुंतवणूक करत आहे. तुर्कस्तानमधील हिऱ्यांचे उद्योग पण महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करत आहेत; असेही चित्रा वाघ म्हणाल्या.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version