लालबागच्या राजाचं विसर्जन

लालबागच्या राजाचं विसर्जन

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : लालबागच्या राजाचे गिरगाव चौपाटी येथे विसर्जन झाले. गुरुवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साडेअकरा वाजता लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाला. राजाचे शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजता विसर्जन झाले. गणेशभक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर जवळपास बावीस तासांनी लालबागच्या राजाचे विसर्जन झाले.

लालबागच्या राजाची मिरवणूक गुरुवारी सकाळी सुरू झाली. ठिकठिकाणी राजाचे स्वागत झाले. राजावर पुष्पवृष्टी करण्यात आली. ढोलताशांच्या गजरात हळू हळू पुढे सरकत शुक्रवारी सकाळी लालबागचा राजा गिरगाव चौपाटी येथे पोहोचला. समुद्राला ओहोटी होती त्यामुळे विसर्जनाला वेळ लागला. लालबागच्या राजासह अनेक गणपती रांगेत होते. समुद्राला भरती आल्यानंतर राजाला आधुनिक तराफ्यावर ठेवण्यात आले. यानंतर आरती करण्यात आली आणि नंतर तराफा खोल समुद्रात नेण्यात आला. कोळी बांधवांनी परंपरेनुसार राजाला बोटींची सलामी दिली. समुद्रात मध्यभागी लालबागचा राजा असलेला तराफा आणि आजूबाजूला कोळी बांधवांच्या बोटी होत्या. खोल समुद्रात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version