भिवंडी : जन्माष्टमीचा सोहळा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत असताना भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड या नागरी वस्तीत उत्तर भारतीय समुदाय मोठ्या संख्येने राहत असलेल्या ठिकाणी स्थानिक नगरसेवक यशवंत टावरे यांच्या युवाशक्ती मित्र मंडळाच्या वतीने साजरा होत असणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या पूर्वसंध्येला रात्री जन्माष्टमीचा सोहळा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा केला गेला. या ठिकाणी भोजपुरी कलाकारांनी कृष्ण जन्माष्टमीची विविध गाणी गात वातावरण भक्तीमय करून ठेवले होते. सोहळ्यात रसिकसुद्धा तेवढ्याच जल्लोषपूर्ण वातावरणात साथ देत सहभागी झाले होते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.