लवकरच बदलणार व्हॉट्सॲपचा लूक

लवकरच बदलणार व्हॉट्सॲपचा लूक

नवी दिल्ली, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी: मेटाच्या मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सॲप मध्ये लवकरच मोठे बदल होणार आहेत. माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅपच्या यूजर इंटरफेस आणि टॉप अ‍ॅप बारमध्ये मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन डिझाइन रिलीझ केल्यानंतर, वरील पट्टी ही पांढऱ्या रंगात दिसणार अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान असं झाल्यास व्हॉट्सॲपचा चेहराच बदलणार असं म्हटलं जात आहे. याशिवाय संपूर्ण अ‍ॅपचा इंटरफेस हिरवा असेल. नवीन डिझाइनची चाचणी अँड्रॉइड बीटा आवृत्ती २.२३.१८.१८ वर केली जात आहे, जरी ती सध्या सर्व बीटा परीक्षकांना दिसत नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीनतम आणि पुढील वैशिष्ट्यांचा मागोवा घेणाऱ्या डब्ल्यूए बीटाइनफो या साइटने ही माहिती दिली आहे.

नवीन अपडेट्ससाठी, व्हॉट्सअ‍ॅपचं बीटा व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. नवीन डिझाइनचा स्क्रीनशॉट देखील समोर आला आहे. नवीन डिझाईन अपडेट कधी रिलीज होईल याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हा अपडेट सामन्यांना कधी वापरायला मिळणार हे सांगतिले जाऊ शकत नाही.

विशेष म्हणजे मागील काही काळापासून व्हॉट्सअ‍ॅप हे आपल्या अ‍ॅपमध्ये नवनवीन बदल आणत नवीन फीचर्सही आणत आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅप ने एचडी व्हिडिओ आणि एचडी फोटो पाठवण्याची सुविधा जारी केली आहे. आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एचडी फोटो पाठवू शकता आणि ७२० पिक्सेल म्हणजेच एचडी व्हिडिओही पाठवू शकणार आहात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version