हिंगणा एमआयडीसीत भीषण आग

हिंगणा एमआयडीसीत भीषण आग

नागपूरमध्ये अ‍ॅग्रो कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. हिंगणा एमआयडीसीमध्ये ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

कटारिया अ‍ॅग्रो प्रा. लि. या कंपनीला सोमवारी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या ३ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या कामगारांना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कंपनीला लागलेल्या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या ही आग नियंत्रणात आली आहे. कंपनीला लागलेली ही आग इतकी भीषण आहे की धुराचे लोट आसपासच्या परिसरामध्ये पसरले आहेत. आगीमध्ये कंपनीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version