पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा मुंबई दौऱ्यावर आले मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मोदी यांनी दोन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला. तसेच काही वेळाने ते दाऊदी बोहरा समुदायाच्या शैक्षणिक संस्थेच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन करतील. मोदींनी सीएसएमटी- सोलापूर आणि सीएसएमटी-शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत एक्स्प्रेसच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भाषण झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींचे आभार मानले. तसेच त्यांनी अर्थसंकल्पात राज्याला भरभरून निधी दिल्याबद्दल आणि मुंबईतल्या विकसाकामांच्या लोकार्पणाला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले. एकनाथ शिंदे मोदींना म्हणाले की, “राज्यात आमचं हे सहा-सात महिन्यांचं सरकार केवळ तुमच्या आशीर्वादाने बनलं. तुमच्यामुळे सामान्य माणसांच्या मनातलं सरकार सत्तेवर आलं. एकनाथ शिंदे मोदींना म्हणाले
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.