आदित्यच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा सत्कार

आदित्यच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचा सत्कार

राज्यभर सुरू होणाऱ्या सुसंवाद दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. विविध मतदारसंघातील शेतकरी, नागरिकांसह संवाद साधण्याचा हा दौरा असल्याचं ते म्हणाले. वरळीत आयोजित मुख्यमंत्र्यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावरही आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं आहे. त्यानंतर शिंदे गट आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, “माझ्या विधानावरुन भरपूर चर्चा झाली. सोशल मीडियावरही हाच विषय चालू होता. एक नक्की…हिला दिया. एवढ्या सगळ्यांनी ट्वीट करण्यापेक्षा स्वतः सांगितलं असतं की लढायची ताकद नाहीय, हिंमत नाहीय, तरी चाललं असतं.” असंही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, मविआची ताकद राज्यात वाढत चालल्याचंही यावेळी आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या वरळी इथल्या सत्कार कार्यक्रमासाठी हजेरी लावणार आहेत.  तर यावेळी मुख्यमंत्री शिंदे काय बोलतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version