सरकारच्या वतीने बजेट सादर करण्यात आले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा पाचवा अर्थसंकल्प होता. टॅक्स भरणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. या अर्थसंकल्पाद्वारे करपात्र उत्पन्नाची मर्यादा ७ लाखांनी वाढवण्याची घोषणा सीतारामण यांनी केली. बेरोजगार आणि महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यना यंदाच्या अर्थसंकल्पाकडून मोठी आशा होती. त्यामुळे सर्वसामान्यांना सरकारच्या या निर्णयाने दिलासा दिला आहे.
सध्या 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेले नागरिक कोणताही टॅक्स भरत नाही. ही मर्यादा ७लाखांपर्यंत वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केली. नव्या कररचनेचा स्वीकार करणाऱ्यांना ही पद्धती लागू होणार आहे.नव्या करश्रेणीत २.५ लाखांपासून स्लॅब सुरू झाले होते. आता स्लॅब्जची संख्या ५ पर्यंत कमी करण्यात आली आहे.
३ लाखांपर्यंत – कोणताही कर नाही
३ ते ६ लाख – ५ टक्के
६ ते ९ लाख – १० टक्के
९ ते १२ लाख – १५ टक्के
१२ ते १५ लाख – २० टक्के
१५ लाखांहून जास्त – ३० टक्के
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.