‘महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार’

‘महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार’

राज्यातील सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी संजय राऊत यांनी माध्यमांंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे, फडणवीस सरकावर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार राज्यघटनेची मोडतोड करून सत्तेत आले आहेत. घटनाबाह्य सरकारवर घटनेचा हातोडा पडल्याशिवाय राहणार नाही. आमचा न्यायालयावर आणि राज्यघटनेवर विश्वास असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

यावेळी संजय राऊत म्हणाले, आमचा न्यायालयावर, घटनेवर विश्वास आहे. कोर्टाकडून आम्हाला न्याय मिळेल. घटनेचा हातोडा घटनाबाह्य सरकारवर पडल्याशिवाय राहणार नाही, यावेळी संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर देखील टीका करत देशात काही नवं घडणार नाही. दिल्लीत महाराष्ट्राचा अपमान होत आहे. केंद्रात फेरबदल झाले तरी तेच पत्ते पिसणार, राज्यात सुडाचं राजकारण सुरू आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

एक दिवस असा येईल की सत्ताधाऱ्यांना फटका बसेल. महाशक्ती व न्याय व्यवस्था असा हा संघर्ष सुरु आहे. त्यात न्याय व्यवस्थेचाच विजय होईल, सध्या सुडाचे राजकारण सुरु आहे. गेल्या ६०-६५ वर्षात असे सुडाचे राजकारण महाराष्ट्राने बघितले नाही. तसेच भ्रष्ट नेत्यांना काढण्यासाठी किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देण्यासाठी मंत्रिमंडळात बदल केले जातात. त्यापलिकडे काही होत नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version