शिंदे गटातही धुसफूस

शिंदे गटातही धुसफूस

मंत्रीमंडळ विस्तारावरून सत्ताधारी पक्षातील आमदारांनी नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. मंत्रिमंडळ विस्तार होणार की नाही, याबाबत खुलासा लवकर करावा असा इशाराच बच्चू कडू यांच्याकडून सरकारला देण्यात आला होता. आता आमदार संजय गायकवाड यांनीही मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही असं वक्तव्य केलं आहे.

तर, बच्चू कडू यांच्या या वक्तव्यांचं समर्थन करत अनेकजण मंत्रिपदासाठी उत्सुक आहेत, मंत्रिपदाचा विस्तार झाला तर राज्यातील कामे जलद गतीने होतील, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले. आम्ही कुणीही मंत्रिपदासाठी इच्छुक नाही. पण मंत्रिमंडळ विस्तारासाठी इतका वेळ चांगला नाही. सहा महिने निघून गेले आहेत, आम्ही फडणवीस आणि शिंदे साहेबांना विनंती करतो की लवकर मंत्रिपदाचा विस्तार करावा, असं संजय गायकवाड म्हणाले.

शिंदे गटाचा डीएनए चेक केला पाहिजे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, ‘आमचा डीएनए चेक केला तर नक्कीच बाळासाहेबांचे विचारच बाहेर पडतील. मात्र, यांचा डीएनए चेक केला तर काय बाहेर पडेल? हे कोणत्या विचारांनी तिकडे गेले? जे परिवर्तन व्हायचं होतं तर सहा महिन्यापूर्वीच झालं आहे, आता खरं परिवर्तन त्यांचं होणं बाकी आहे की त्यांच्या डोक्यात बाळासाहेबांचे विचार जाणे आणि परिवर्तन होणं गरजेचं आहे’, असं प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version