माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणी सीबीआयने चौकशीसाठ मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. येथे संजय पांडे यांची सीबीआयने ६ तास चौकशी करण्यात आली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात खंडणीवसुलीचे केलेला आरोप मुंबई पोलीसचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांनी मागे घ्यावेत यासाठी संजय पांडे यांनी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. परमबीर यांनी केलेला हा आरोप चौकशीच्या अधीन असून देशमुख यांच्याबाबतच्या कथित आरोपांची चौकशी सध्या सीबीआय करत असल्याने त्या प्रकरणी संजय पांडे यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार सीबीआयने संजय पांडे यांची ६ तास चौकशी केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.