एसटी महामंडळ राज्यशासनामध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. दरम्यान, अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत.
एसटी महामंडळ राज्यशासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून आज अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या संपकाळात अनेक एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, मृत्यू झाल्याच्या घटना समोरल आल्या. त्यामुळे आज अकोल्यात १०० मेणबत्या पेटवून संपकाळातील मृत कामगारांना आदरांजली वाहण्यात आली.
अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या वेतनामुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे तसेच महामंडळ शासनात विलिनीकरण व्हावे, ही कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. तर या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक झाले असून आतापर्यंत अकोल्यातील ८० कर्मचाऱ्यांनी जीवन संपविले आहे. अकोल्यातील एसटी कर्मचारी दुखवटा पाळत असून या दुखवट्याला म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या संपाला आज १०० दिवस पूर्ण झाले आहेत. त्यामुळे अकोल्यातील एसटी आगार क्रमांक १ मधील संपकारी कर्मचाऱ्यांनी १०० मेणबत्ती पेटवून संपादरम्यान मृत्यू पावलेल्या कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.