धुळ्यात जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था

धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे.
धुळ्यात जिल्हा परिषद शाळांची दुरवस्था

धुळे : धुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाली आहे. जिल्हा परिषदच्या १६२ शाळांमधील तब्बल ३९८ वर्ग खोल्या ह्या पडक्या व जीर्ण झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ही माहिती समोर आली आहे. या जुन्या वर्गखोल्या निर्लेखन करण्यासाठी शिक्षण विभागातर्फे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र निधी अभावी जुन्या पडक्या वर्ग खोल्यांचा निर्लेखन करण्याच प्रलंबित आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अत्यंत धोकादायक पद्धतीने या शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर शिक्षण घेण्याची वेळ आली आहे

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version