मंत्री महिलेची बदनामी करत असताना मुख्यमंत्री गप्प का? – चित्रा वाघ

मंत्री महिलेची बदनामी करत असताना मुख्यमंत्री गप्प का? – चित्रा वाघ

 क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसबीच्या अटकेत आहे. तसेच याप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. वानखेडेंची बाजू मांडण्यासाठी त्यांच्या पत्नी क्रांती रेडकर या मैदानात उतरल्या. याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला आहे.

 महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक हे खुलेआम एका महिलेच्या कौटुंबिक विषयाबाबत सर्व माध्यमांपुढे नाहक बदनामी करत आहेत. साध्या ट्विटवर गुन्हा दाखल करणारे राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आज उघडेपणे एका महिलेची बदनामी होत असताना गप्प का आहेत? असा सवाल चित्रा वाघ यांनी ट्विट करत राज्यसरकारला विचारला आहे.

 चित्रा वाघ म्हणाल्या, ‘आज उघडेपणे एका महिलेची बदनामी होत असताना मुख्यमंत्री गप्प का आहेत? यावरून असे सिद्ध होते की, काँग्रेस प्रवृत्तीने डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा साम-दाम-दंड-भेद वापरून निवडणूकीत पराभव केला होता, ती काँग्रेस प्रवृत्ती सत्तेवर येते तेव्हा दलित आणि शोषितांवरील अन्याय पहायला मिळतो.’

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version