‘या’ नृत्यदिग्दर्शकाने का केली आत्महत्या ?

‘या’ नृत्यदिग्दर्शकाने का केली आत्महत्या ?

मुंबई, 2 मे २०२३, प्रतिनिधी :तेलगू इंडस्ट्री मध्ये आणखीन एक मोठा धक्का बसला. तेलगू नृत्यदिग्दर्शक चैतन्यने ३० एप्रिल रोजी आत्महत्या केली.मिळालेल्या माहितीनुसार,चैतन्यवर बरच कर्ज झालं होतं आणि ते कर्ज इतकं जास्त झालं की, चैतन्यला ते कर्ज फेडता आलं नाही.त्यामुळे त्याने आंध्रप्रदेश मधील नेल्लोर मध्ये गळफास लावून आत्महत्या केली.चैतन्य हा तेलगू इंडस्ट्री मधला सर्वात प्रसिद्ध असलेला धी डान्स शो मध्ये नृत्य दिग्दर्शन करायचा.आत्महत्या करण्यापूर्वी चैतन्यने समाज माध्यमांवर व्हिडीओ देखील सामायिक केला .

आत्महत्या का केली हे सामायिक केलेल्या व्हिडिओत त्याने खुलासा केला.की, माझं वाढलेल कर्ज मी फेडू शकत नाही.कर्ज फेडण्यासाठी मी सक्षम नाही. माझी आई, वडील आणि बहिणीने माझी मनापासून खूप काळजी घेतली. मला कधीही कोणतीही अडचण येऊ दिली नाही. मी माझ्या सर्व मित्रांची मनापासून माफी मागतो. मी अनेकांना नाराज केलं आहे आणि त्यासाठी मी सर्वांची माफी मागतो. पैशाच्या बाबतीत मी माझा चांगुलपणा गमावला. केवळ कर्ज घेण्यास सक्षम नसून ते फेडण्याची क्षमताही असली पाहिजे. पण मी ते करू शकलो नाही. सध्या मी नेल्लोरमध्ये आहे आणि हा माझा शेवटचा दिवस आहे. मी माझ्या कर्जाचा त्रास सहन करू शकत नाही.” असं त्याने व्हिडीओ मध्ये सांगितलं.

हा व्हिडीओ तसच त्याच्या मृत्यूची बातमी पाहून चैतन्यच्या चाहत्यांना धक्का बसला.त्यानंतर अनेकांनी त्याचा फोटो समाज माध्यमांवर सामायिक करत चैतन्यला श्रद्धांजली वाहिली. सध्या समाज माध्यमांवर चैतन्यचा व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version