नागपुरात पार पडलेल्या धीरेंद्र शास्त्रींच्या दिव्य दरबाराविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून नागपूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. यावर नागपूर पोलिसांकडून धीरेंद्र शास्त्री यांना क्लिनचीट देण्यात आली आहे.
बागेश्वरधामचे धिरेंद्र महाराज यांच्या नागपुरातील दिव्य दरबारात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचे उल्लंघन झाले नसल्याचे पत्र नागपूर पोलिसांनी अंनिसचे सह अध्यक्ष श्याम मानव यांना दिले आहे. याप्रकरणी, ‘पोलिसांवर दबाव आहे म्हणून पूर्णतः कायद्याचं उल्लंघन झाले असतानाही पोलिसांनी नकार दिला आहे’, अशी प्रतिक्रिया श्याम मानव यांनी दिली आहे. याप्रकरणी, पुढे ‘मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांची भेट घेऊन, न्यायालयातही धाव घेण्याची तयारी, श्याम मानव यांनी दाखविली आहे.
नागपूर पोलिसांनी ‘धीरेंद्र शास्त्रींच्या भाषणात कुठलेही आक्षेपार्य वक्तव्यं नाही त्यामुळे त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही’, असे म्हणत धीरेंद्र शास्त्रींना क्लिनचीट दिली आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.