बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. दरम्यान लग्नापूर्वी त्याने त्याच्या आलिशान घराची झलक दाखवली. बारामतीत राहणाऱ्या सूरज चव्हाणने नुकतचं त्याच स्वप्नातलं घर बांधलं आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरजला दिलेल्या शब्दाचा मान राखत त्याला हे घर बांधण्यासाठी मदत केली होती. घराचे काम पूर्ण झाल्यानंतर अजित पवार यांनी सूरजला मेसेजद्वारे अभिनंदन केले होते. तसेच सूरजने देखील घराची वास्तूशांतीची पूजा केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत अजित पवार यांना मेन्शन करत त्यांचे आभार मानले होते.
यानंतर सूरज चांगलाच चर्चेत आला. यानंतर आता सर्वांच लक्ष्य सूरजच्या घरावर लावलेल्या पाटीकडे वळलं आहे. सूरजच्या घराच्या नेमप्लेटवर त्याच आणि त्याच्या पत्नीच नाव नसून वेगळंच नाव पाहायला मिळतंय. सूरजच्या आलिशान घरावर ‘आई आप्पांची पुण्याई’ अशा नावाची नेमप्लट लावण्यात आली आहे. अनेकदा ज्यावेळेस सूरजला त्याच्या घराबद्दल आणि कुटूंबाबद्दल विचारण्यात आले असता तो नेहमी हळवा झाल्याचं पाहायला मिळालं. बिग बॉस मराठीच्या घरात असताना त्याने एकदा सांगितलं होत की, त्याचे आई-वडील तो लहान असतानाच त्याला सोडून गेले होते.
त्याने लहानपणीच त्याचे आई-वडील गमावल्यामुळे, आई-वडिलांशिवाय त्याच बालपण हलाखीच्या परिस्थितीत घालवलं आहे. त्याचं त्याच्या आई-वडिलांवर अतोनात प्रेम आहे. त्यामुळे ज्यावेळेस त्याच्या स्वप्नातलं घरं पूर्ण झालं त्यावेळेस त्याने त्याच्या आलिशान घराला त्याच्या आई-अप्पाचं नाव दिलं आहे. या नेमप्लटच्या खाली त्याने त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावाची नेमप्लट लावली आहे. जी श्री. सुरज चव्हाण आणि सौ. संजना चव्हाण अशी आहे. त्याच्या या कृतीमुळे सूरज त्याच्या आई-वडिलांचा किती आदर आणि सन्मान करतो हे कळतंय.
सूरजच्या आलिशान घराच स्ट्रक्चर हे एखाद्या लक्झरी बंगल्याप्रमाणे डोळे दिपावणारं आहे. सूरज हे घर दोन मजली असून फारच मोठ्ठ आणि आलिशान आहे. घराचे फ्लोरिंग, किचन सगळं हायटेक आणि इतर गोष्टी टेक्नॉलॉजीनं परिपूर्ण आहेत. घराबाहेर मोठं अंगण तर घरात मोठा हॉल आहे आणि हॉलला लागून भलं मोठं किचन आहे. सुरजच घर हे एखाद्या आलिशान बंगल्यापंक्षा कमी नाही. नुकतीच त्याच्या घराची वास्तूशांतीची पूजा पार पडली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.