रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला शिवसेना खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी मविआ सरकारच्या निधी वाटपाबाबत गजानन किर्तीकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याचा आरोप किर्तीकर यांनी केला आहे.
गजानन किर्तीकर म्हणाले, एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या २५/१५ योजनेमधून निधी मिळविण्यासाठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही. मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवतो. मात्र, निधीची पळवापळव केल जात असून ‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो? पवार सरकार’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर यांनी निधीवाटपाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.