डॉ.अमोल कोल्हे रुग्णालयात दाखल

डॉ.अमोल कोल्हे रुग्णालयात दाखल

मुंबई, 4 मे २०२३, प्रतिनिधी :अमोल कोल्हे यांचं ”शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये त्याचे यशस्वी प्रयोग झाले आहेत.मात्र, रविवारी रात्री प्रयोग सुरु असतानाच त्यांची घोड्यावरुन एन्ट्री होत असताना त्यांचा अपघात झाला. अमोल कोल्हेंनी व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली असून त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला. अमोल कोल्हे यांची घोड्यावरुन एन्ट्री दाखवण्यात आली आहे. त्यामुळे घोड्यावरुन एन्ट्री करत असताना त्यांच्या घोड्याचा मागचा पाय अचानकपणे दुमडला. ज्यामुळे पाठीला जर्क बसून अमोल कोल्हे यांना दुखापत झाली.

पाठीला दुखापत झालेली असतानादेखील त्यांनी हा प्रयोग पूर्ण केला. परंतु, त्यांना पुढील प्रयोग करता येणार नाहीयेत.दुखापत असतानाही कराडच्या कल्याणी मैदानात अमोल कोल्हे यांनी कराडचा प्रयोग केला. मात्र पुढचे दोन्ही प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.अमोल कोल्हे यांनी सांगितलं. पुरेशी विश्रांती व उपचार घेऊन पिंपरी चिंचवड येथील एच. ए. मैदानावर 11 ते 16 मे कालावधीत होणारे ‘शिवपुत्र संभाजी’महानाट्याचे प्रयोग ठरल्याप्रमाणे होतील, असेही अमोल कोल्हे यांनी सांगितले.

अमोल कोल्हेंनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका असो किंवा संभाजी महाराजांची भूमिका, त्यांच्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘राजा शिवछत्रपती’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या ऐतिहासिक मालिकांमध्ये डॉ. अमोल कोल्हेंनी काम केलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version