‘बरंय, माझं मुंबईत घरंच नाहीये’

‘बरंय, माझं मुंबईत घरंच नाहीये’

राज्यसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालात भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला. त्यानंतर मुंबईतील भाजप  कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन केलं. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यासोबतच शिवसेनेला एक सल्लाही दिला आहे. मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून कंगना राणौत, नारायण राणे, मोहित कंबोज, नवनीत राणा यांच्या घरांना नोटीस बजावण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड मी तर नशिबवान आहे माझं मुंबईत घरंच नाहीये. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच मिळेल. नाहीतर मलाही नोटीस आलीच असती. मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपुरातील घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला नोटीस आलेली नाही. ही पद्धत योग्य नाही. केवळ सरकार चालवण्यासाठी, पदांसाठी सरकार चालवायचं. समाजातील एकाही घटकाचा विचार करायता नाही ही अवस्था आज पहायला मिळते ती अत्यंत खराब आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यसभेच्या निवडणुकीत झालेला आपला विजय हा खरे आपले लढवयै आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित केला पाहिजे. कारण, शआरीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते इथं आले. माझ्या पक्षाला आवश्यकता आहे आणि काही झालं तरी मतदान करणारच या भावनेतून त्यांनी मतदान केलं. त्यांच्यामुळे आपली तिसरी जागा व्यवस्थित निवडून आली. त्यामुळे त्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार मानतो.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version