नागपूर शहरात पाणी टंचाई असल्याने त्याचा फटका गणपती विसर्जनालासुद्धा बसणार आहे. कृत्रिम टॅंकसाठी यावर्षी पिण्याचं पाणी पाणी दिलं जाणार नाही. विहिरी आणि बोअरवेलचंच पाणी वापरण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत, तर शहरातील फुटाळा तलाव वगळता कुठल्याही तलावात विसर्जन करता येणार नाही.
नागपुरात यावर्षी पाणी टंचाई असल्याने गणपती विसर्जनासाठी विहिरी आणि बोअरवेलचं पाणी वापरण्याच्या सूचना महापालिकेने केल्या आहेत.
सोबतच पर्यावरणाच्या संवर्धनासाठी शहरातील फुटाळा तलाव वगळता कुठल्याही तलावात गणपती विसर्जन करता येणार नाही, अशी सूचनाही देण्यात आली आहे.
शहरातील गांधी सागर तलाव, अंबाझरी, सोनेगाव, सक्करदरा तलाव या ठिकाणी विसर्जन करता येणार नाही.
त्या दृष्टीने तयारी सुद्धा करण्यात आली असून या सगळ्या तलावांना टिनचं कुंपण घालण्यात आलं.
शहरात कधी नव्हे ती पाणी टंचाई निर्माण झाली. पाणी कपात करावी लागली. अशात शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात सुद्धा पाणी नाही.
त्यामुळे महापालिका नागरिकांना पाणी बचतीचा संदेश देत आहे आणि पिण्याचे पाणी वाचवण्याचा प्रयत्न करतंय.
शहरातील नागरिकांनी कृत्रिम तलावातच विसर्जन करावा असा प्रयत्न केल्या तीन चार वर्षांपासून सुरु आहे. त्याला प्रतिसादसुद्धा चांगला मिळायला सुरवात झाली. मात्र या वर्षीची पाणी समस्या बघता पिण्याचं पाणी वाचवण्याची गरज आहे. हा प्रयत्न चांगला असला तरी विहिरी किंवा बोरवेलच पाणी महापालिकेला उपलब्ध करून द्यावं लागणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.