‘आम्ही कारखाने बंद करतोय’; जगातील दिग्गज ऑटो कंपनीचा मोठा निर्णय, 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर

फोक्सवॅगन कंपनी मोठ्या पुनर्रचनेच्या तयारीत असून सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. जर्मनीतील काही कारखानेही बंद होऊ शकतात
‘आम्ही कारखाने बंद करतोय’; जगातील दिग्गज ऑटो कंपनीचा मोठा निर्णय, 1 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर

जगातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या फोक्सवॅगनसमोर (Volkswagen) सध्या मोठी आर्थिक आणि व्यावसायिक आव्हाने उभी ठाकली आहेत. वाढती स्पर्धा, कमी होत असलेली मागणी आणि बदलते जागतिक बाजारपेठेचे चित्र यामुळे कंपनी मोठ्या पुनर्रचनेच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सुमारे एक लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जर्मनीस्थित फोक्सवॅगन समूहात सध्या सुमारे 6.57 लाख कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर ब्लूम यांनी कंपनी अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च कपातीचा आराखडा तयार केल्याचे वृत्त आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यासोबतच काही कारखाने बंद करण्याचाही प्रस्ताव समाविष्ट असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Indian Railway Refund Rules: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! प्रवास पूर्ण झाल्यावरही मिळू शकतो तिकीटाचा रिफंड; रेल्वेचा 'हा' नियम तुम्हाला माहिती आहे का?

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने यापूर्वी जाहीर केलेल्या कर्मचारी कपातीच्या योजनेपेक्षा अधिक मोठे पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. दशकाच्या अखेरीपर्यंत प्रशासकीय आणि इतर खर्चात सुमारे 11 अब्ज युरोंची बचत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

फोक्सवॅगनच्या जर्मनीतील काही महत्त्वाच्या उत्पादन केंद्रांवरही याचा परिणाम होऊ शकतो. ऑडीचा नेकार्सुल्म कारखाना, फोक्सवॅगनचा हॅनोव्हर, झ्विकाऊ आणि एम्डेन येथील कारखाने बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संभाव्य निर्णयामुळे जर्मनीतील औद्योगिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

कंपनीला सध्या अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. अमेरिकेचे आयात शुल्क, चीनमधील वाहनांच्या मागणीत झालेली घट आणि BYD, Stellantis यांसारख्या प्रतिस्पर्धी कंपन्यांकडून वाढलेली स्पर्धा यामुळे फोक्सवॅगनच्या नफ्यावर दबाव वाढला आहे.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: बळीराजासाठी खुशखबर! 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार कर्जमाफीचे पैसे; सरकारची मोठी घोषणा

दरम्यान, कंपनीने आधीच काही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. निधी उभारण्यासाठी कंपनीने आपल्या मरीन इंजिन व्यवसायातील मोठा हिस्सा विकला आहे. तसेच सुमारे 28 हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. उत्पादन क्षमतेतही कपात करण्यात आली असून वार्षिक उत्पादन 1.2 कोटी वाहनांवरून सुमारे 90 लाख वाहनांपर्यंत कमी करण्यात आले आहे.

मात्र, कंपनीच्या या योजनांना कामगार संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. IG Metall आणि कंपनीच्या वर्क्स कौन्सिलने अशा निर्णयांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढत असल्याचे सांगत, आवश्यक असल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

फोक्सवॅगनने या वृत्तांवर अधिकृत प्रतिक्रिया देताना, भविष्यातील गरजांनुसार व्यापक बदल आवश्यक असल्याचे मान्य केले असले तरी, संभाव्य कारखाना बंदी किंवा कर्मचारी कपातीबाबत स्पष्ट भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version