पालघर जिल्ह्यातील पंधरा पेक्षाही जास्त गाव मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यात आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे निवडणूक निर्णय अधिकारी तसंच पालघर जिल्हाधिकारी यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या वाढवण येथे होऊ घातलेल्या बंदरामुळे विरोध असलेल्या किमरपट्टी वरील अनेक गावांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
तर दुसरीकडे केळवे, वाढीव, खारेकुरण तसंच ग्रामीण भागातील अनेक गावांनी मूलभूत सुविधा नसल्याने मतदान न करण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे अनेक गावांमध्ये जाऊन निवडणूक निर्णय अधिकारी मतदारांची समजूत घालत असले तरी मतदारांना समजूत घालण्यात अधिकाऱ्यांना अपयश येत आहे.
मतदारांनी आपला बहिष्काराचा पवित्रा मागे घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडून करण्यात आलं.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.