ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३व्या वर्षी निधन झाले आहे. राहुल बजाज गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यात उपाचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान उद्योगपती राहुल बजाज यांची प्राणज्योत मालवली.
बजाज समुहाचे दिशादर्शक राहुल बजाज यांच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
१० जून १९३८ रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला. तर हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीएचे शिक्षण केले आहे. बजाज समुहाला नावारुपास आणण्यात राहुल बजाज यांचे मोठे योगदान आहे. १९६५मध्ये ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी बजाज ग्रुपची सुत्रे हातात घेतली. २००१मध्ये राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००५मध्ये त्यांनी बजाज ग्रुपची सुत्रे पुत्र राजीव बजाज यांना दिली. मॅनेजिंग डायरेक्टर पदाची जबाबदारी त्यांनी राजीव बजाज यांना दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.