US Restaurant Shooting: अमेरिकेत हाहाकार! रेस्टॉरंटमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. मात्र, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
US Restaurant Shooting: अमेरिकेत हाहाकार! रेस्टॉरंटमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, अनेक जखमी

अमेरिकेतील आयडाहो (Idaho) राज्यात शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ट्विन फॉल्स (Twin Falls) येथील In-N-Out Burger रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीने अचानक गोळीबार केला. या घटनेत किमान तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. हल्लेखोराचाही मृत्यू झाला आहे. मात्र, त्याचा मृत्यू कसा झाला, याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

घटना घडल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. रेस्टॉरंटमध्ये उपस्थित असलेले ग्राहक आणि कर्मचारी जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. काहींनी जवळच्या दुकानांमध्ये आश्रय घेतला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा-RERA Update: घर खरेदीदारांसाठी मोठा धक्का! गृहप्रकल्पांना 4 महिन्यांची मुदतवाढ, तक्रारही करता येणार नाही 

माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि वैद्यकीय पथके घटनास्थळी पोहोचली. सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील काही रस्ते बंद करण्यात आले. तसेच नागरिकांना त्या भागात न जाण्याचे आवाहन करण्यात आले होते.

पोलिसांनी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आहे. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय होते, हल्लेखोराने गोळीबार का केला, याचा तपास सुरू आहे. तसेच मृत आणि जखमींची ओळख पटवण्याचे कामही सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version