Iran US War: तेहरान हादरलं; अमेरिकेकडून इराणमध्ये निवासी इमारतींवर बॉम्ब हल्ला, 13 जणांचा मृत्यू

अमेरिका-इराण संघर्ष तीव्र होत असून तेहरानमध्ये हवाई हल्ल्यांमुळे जीवितहानी झाली आहे.
Iran US War: तेहरान हादरलं; अमेरिकेकडून इराणमध्ये निवासी इमारतींवर बॉम्ब हल्ला, 13 जणांचा मृत्यू

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निर्णायक टप्प्यावर पोहोचत असून, परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीचा कालावधी संपत आल्याने अमेरिका आणि इस्रायलने इराणवरील हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे.

इराणची राजधानी तेहरान जवळील दक्षिण-पश्चिम भागात एका निवासी इमारतीवर झालेल्या हवाई हल्ल्यात किमान 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती इराणी माध्यमांनी दिली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

या दरम्यान, शरीफ युनिव्हर्सिटीलाही लक्ष्य करण्यात आले. या विद्यापीठाचा संबंध इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी असल्याचा आरोप अनेक देशांनी यापूर्वी केला आहे. या हल्ल्यामुळे विद्यापीठ परिसरातील इमारतींचे नुकसान झाले असून जवळील नैसर्गिक वायू वितरण केंद्रालाही फटका बसल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा: Kolhapur Government Hospital: ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच दारूच्या नशेत; रुग्णांच्या जीवाशी खेळ, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

इराणमधील अनेक भागांत रात्रभर स्फोटांचे आवाज घुमत होते. कमी उंचीवरून उडणाऱ्या लढाऊ विमानांचा आवाज अनेक तास ऐकू येत होता. तसेच, दक्षिण तेहरानजवळील कोम येथेही एका निवासी भागावर हल्ला झाला असून किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मात्र, या हल्ल्याचे नेमके लक्ष्य काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणची रिव्होल्युशनरी गार्ड आणि इतर सुरक्षा यंत्रणा सतत ठिकाणे बदलत असल्याची माहिती मिळत आहे. सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे त्यांनी पर्यायी तळांचा वापर सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थ देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. दोन टप्प्यांत होणाऱ्या संभाव्य कराराचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात 45 दिवसांच्या युद्धविरामाचा प्रस्ताव असून, या काळात दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांततेसाठी चर्चा होणार आहे. चर्चेत प्रगती झाल्यास हा युद्धविराम पुढे वाढवण्याचाही विचार केला जात आहे.

एकूणच, मध्य पूर्वेतील हा संघर्ष अधिकच तीव्र होत असून, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवस या संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. 

हेही वाचा: Elphinstone Bridge: ब्रिटिशकालीन पूल अखेर जमिनदोस्त, लवकरच उभा राहणार हायटेक ‘डबलडेकर’ पूल

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version