अवकाळी पावसामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना फटका

अवकाळी पावसामुळे फळ उत्पादक शेतकऱ्यांना फटका

बुधवारपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. फळ बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असून पावसाचा फटका आंबा उत्पादकांना बसला असून नाशिकमध्ये द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाचा आंबा उत्पादकांना फटका

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी पावसामुळे हवालदिल झाले आहेत. आंब्याच्या बागेत केलेल्या फवारण्या, साफसफाई, खत व्यवस्थापन याचा केलेला शेतकऱ्यांचा खर्च पूर्णपणे वाया गेला आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याना आलेला मोहोर गळून गेला तर काही ठिकाणी कुजून गेला आहे. तर येणारा मोहोर कुजून जाणार आहे. त्यामुळे आंबा पिकावर किडरोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे.

जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून आंबा सिझन एक महिना पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

नाशिकमध्ये द्राक्ष बागांचे नुकसान

नाशिकसह जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस बरसला. अनेक सखल भागात पाणी साचले असून नाशिक जिल्ह्यात दाणादाण उडाली आहे. डिसेंबर महिन्यातील या २४ तासांतील पावसामुळे ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे. अवेळी आलेल्या या पावसाचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. अनेक द्राक्षबागेत पाणी साचल्याने द्राक्ष बागांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

स्ट्रॉबेरीसह ऊस शेतीचे नुकसान

राज्यात हिवाळी दिवसांत पावसाळा सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बुधवारी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. दिवसभर पाऊस, ढगाळ हवामान धुके आणि कडाक्याची थंडी असे विचित्र वातावरणाचा जिल्हावासियांना दिवसभर सामना करावा लागत आहे. महाबळेश्वर पाचगणी भिलार येथे अवकाळी पावसाने धुडगूस घातला आहे. या पावसाने स्ट्रॉबेरी पिकासह गहू, ज्वारी पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचून राहिल्याने कोथिंबीर पिकाचेदेखील नुकसान झाले आहे. पाऊस थंडी आणि धुक्यामुळे सर्दी खोकला तसेच सांधेदुखीसारखे आजार बळावले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version