वाशिममध्ये अवकाळी पाऊस

वाशिममध्ये अवकाळी पाऊस

राज्यात उकाड्याचे दिवस असताना, वाशिमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. वाशिमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

गेल्या आठवड्याभरात वाशिम जिल्ह्यात तापमानाचा पारा सातत्याने वाढता आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास वाशिम शहरासह अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून यामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला आहे. मात्र जास्त पाऊस झाला तर भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version