नाशिक, जळगावात अवकाळी पाऊस

नाशिक, जळगावात अवकाळी पाऊस

राज्यात ऐन उन्हाळाच्या दिवसांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिक, जळगावात अवकाळी पाऊस पडला असून पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. मात्र, अवकाळी पावसामुळे रब्बी हंगाम संकटात आला आहे. जिल्ह्यातील गहू, हरभरा पीक कापणीला आले असताना पावसाने लावलेल्या हजेरीमुळे या पिकांची नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नाशिक जिल्ह्यातील कळवण, मालेगाव, त्र्यंबकेश्वर या भागांत सोमवारपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये काही ठिकाणी गारांचा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. तर द्राक्ष आणि कांदा पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.

निफाड तालुक्यातील चांदोरीत अवकाळी पाऊस

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे वादळी वाऱ्यामुळे दोन एकरवरील काढणीला आलेली द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे अंदाचे सात ते आठ लाख रुपयांचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चांदोरी येथील नानासाहेब परशुराम शिंदे यांनी दोन एकर शेतात द्राक्ष बाग फुलवली असून परिपक्व झालेल्या द्राक्ष बागेला वादळी वाऱ्यामुळे तडका बसल्याने दोन एकरवरील द्राक्ष बाग जमीनदोस्त झाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version