अमरावतीत भीषण अपघात झाला आहे. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. अपघात होताच नागरिकांची या ठिकाणी गर्दी झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ३ गंभीर जखमी झालेत. पोलीस घटनास्थळी पोहचताच तात्काळ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या अपघातामुळे महामार्गावरील काही वेळ एका बाजूची वाहतूक वळविण्यात आली होती. सध्या क्रेंनच्या मदतीने रस्ता मोकळा करण्याचं काम युद्ध स्थरावर सुरू आहे.
अवजड साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे कंटेनर चालक सांगत आहे, मात्र कंटेनरची वेगात असल्याने डिवायडर तोडून दुसऱ्या बाजूला गेला आहे. या अपघातानंतर नागपूर-अमरावती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. समोरा-समोर वाहनांची धडक झाल्याने महामार्गावर या अपघाताचा जोरदार आवाज झाला होता, त्यामुळे परिसरातील लोकांनी महामार्गावर प्रचंड गर्दी केली होती. या घटनेची नोंद नांदगाव पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. ही धडक इकती जबरदस्त होती की, समोरासमोर धडक बसल्याने दुसऱ्या कंटेनरची चालकाच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन कंटेनरची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने दोन्ही कंटेनरमधील चालक क्लिनर जखमी झाले आहेत, तर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.