व्हिडीओ: तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा

व्हिडीओ: तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा

तुळजाभवानी देवी आणि महिषासुर यांच्यामध्ये  9 दिवस युद्ध झाल्यानंतर दसऱ्याच्या दिवशी महिषासुर देवीच्या शरणात आला. त्या विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी दसरा हा सण साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे. याच दिवशी तुळजाभवानी देवीची मूर्ती सिंहासनावरुन बाहेर आणली जाते आणि मूर्तीला 108 साड्या गुंडाळून देवीचे माहेर नगर येथून मानाच्या पालखीतून देवीची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. यावेळी मंदीर परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण होते. देवीचा हा उत्सव बघण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच उस्मानाबाद जिल्हा अधिकारी, उस्मानाबादचे खासदार यांनी हजेरी लावली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version