मविआचे आणि भाजपचे तीन खासदार विजयी

मविआचे आणि भाजपचे तीन खासदार विजयी

राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे तीन खासदार विजयी  झाले. अटीतटीच्या लढतीत धनंजय महाडिक यांचा विजय झाला. राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन तसेच भाजपचेही तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव केला आहे. फडणवीसांची खेळी यशस्वी ठरली. महाविकास आघाडीचे 10 अपक्ष फोडण्यात फडणवीसांना यश आलं असल्याचं स्पष्ट झालं आहे.

राज्यसभेचे विजयी उमेदवार खालीलप्रमाणे

संजय राऊत- शिवसेना- ४२
प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- ४३
इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- ४४
धनंजय महाडिक- भाजप-४१
पियुष गोयल-भाजप- ४८
अनिल बोंडे- भाजप- ४८

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये तिसरा उमेदवार निवडून आणताना भाजपने महाविकास आघाडीची मतं फोडली आहेत. त्यामुळे आता दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानपरिषदेसाठी भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानपरिषदेची निवडणूकही गुप्त मतदानाने होणार असल्याने महाविकास आघाडीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे.  धनंजय महाडिक यांना ४१.५ मतं मिळाली तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना ४१ मतं मिळाली. राज्यसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेली मतं पाहता महाविकास आघाडीची चिंता निश्चितपणे वाढली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version