ताम्‍हीणी घाटात कारला अपघात, तिघांचा मृत्यू

ताम्‍हीणी घाटात कारला अपघात, तिघांचा मृत्यू

गुरुवार घातवार ठरत आहे. राज्यातील गुरुवारची अपघाताची ही दुसरी घटना घडली आहे. ताम्हीणी घाटामध्ये कारला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

विक्रम सिंग, निखील घुले आणि चंद्रकांत निकम असे या मृतांची नावं आहेत. हे तिघेही पुण्यातील रहिवासी होते.

या अपघातात इतर २ जणं जखमी झाले आहेत. जखमींवर माणगाव आणि पुण्यातील रुग्णालयात उपचार केले जात आहे.

या जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

ही कार पुण्याहून दिवेआगाराच्या दिशेने जात होती. कोंडेसर गावानजीक एक अवघड वळण आहे.

या वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं. यामुळे ही गाडी थेट रस्त्यानजीक असलेल्या झाडाला धडकली.

दरम्यान चंद्रपुरमध्ये देवदर्शनाहून परतताना अपघात झाला आहे.

चंद्रपूरातील केसलाघाटमध्ये हा अपघात झाल्याची माहिती आहे.

या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जणं जखमी झाले आहेत.

देवदर्शनाहून परतताना भाविकांच्या गाडीला अपघात, 6 जणांचा जागीच मृत्यू

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version