‘ही तर युक्रेनिअन नागरिकांची सामूहिक हत्या’ – ओलेना जेलेन्स्की

‘ही तर युक्रेनिअन नागरिकांची सामूहिक हत्या’ – ओलेना जेलेन्स्की

युक्रेनच्या प्रथम महिला आणि जेलेन्स्की यांच्या पत्नी ओलेना जेलेन्स्की यांनी जागतिक प्रसारमाध्यमांना पत्र लिहिले आहे. रशियासोबत सुरू असलेले हे युद्ध म्हणजे खरे तर युक्रेनिअन नागरिकांची सामूहिक हत्याच असल्याची टीका त्यांनी केली आहे. हे युद्ध किती काळ चालेल हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला शांतता हवी असली तरी आम्ही आमच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढू, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.

रशिया-युक्रेन युद्धाचा चौदावा दिवस

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौदावा दिवस आहे. दरम्यान रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच असून युक्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रशियाकडून होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यात, गोळीबारात युक्रेनचे अनेक नागरिक मारले गेले आहेत. रशियाकडून युक्रेनमधील मारियुपोलमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या मृतदेहांवरून विध्वंसाचे दृश्य दिसत आहे.

रशियाकडून युद्धविरामाचे उल्लंघन

रशियाकडून वारंवार युद्धविरामाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केला आहे. रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात येते मात्र, त्यानंतर वारंवार रशिया युद्धविरामाचे उल्लंघन करते. त्यामुळे युक्रेन नागरिकांना शहर सोडणे कठीण होत असल्याचा आरोप युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विट करत केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version