पाणीटंचाईचा झळा नाही

पाणीटंचाईचा झळा नाही

कल्याण ,डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह ठाणे च्या वागळे स्टेट, नवी मुंबई एमआयडीसी सह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसी परिसरातील उद्योगांनाही सुरळीत पाणी पुरवठा सुरू राहणार. धरणात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे यंदा पाणी कपातीचे नियोजन केले नसल्याचे लघु पाटबंधारे विभागाची माहिती आहे. अंबरनाथच्या बारवी धरणात आज मीतीस 73% पाणीसाठा आहे. शहरामध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईचा झळा बसणार नाही असं सांगण्यात आलं आहे.

अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी यांच्या ढिसाळ कारभारामुळे या दोन्ही शहरांतील अनेक भागात भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत असतो. अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही शहरांतील वाढती गृहसंकुले आणि लोकसंख्येनुसार तेथील पाण्याची मागणी प्रचंड वाढत आहे. मात्र या दोन्ही शहरांना पाणीपुरवठा करणारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि एमआयडीसी रहिवाशांना सुरळीत पाणीवितरण करण्यात अपयशी ठरत होती. मात्र आता सुरळीत पाणी पुरवठा सुरू राहणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version