‘भाजपमध्ये मनसेला येण्याची गरज नाही’ – रामदास आठवले

‘भाजपमध्ये मनसेला येण्याची गरज नाही’ – रामदास आठवले

ठाण्यात मनसेच्या पार परडेल्या उत्तर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मविआवर निशाणा साधला. तर ईदीपूर्वी मशिदीवरील भोंग उतरवा अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालीसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. यावर, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मनसेच्या भोंग्याला विरोध केला असून मनसेला भाजपमध्ये येण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया राम रामदास आठवले यांनी दिली आहे. तसेच ‘जसा उंच असतो ढोंगा, बरानाही भोंगा’, असा टोला यावेळी आठवलेंनी त्यांच्या शैलीत राज ठाकरेंना लगावला आहे.

रामदास आठवले म्हणाले, काही दिवसांपासून मनसेच्या भोंग्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देत आहेत. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका कट्टर होती, परंतु ते कधीच भोंगे उतरवा असे बोलले नाही. त्यामुळे नेत्यांनी इतरांचे भोंगे उतरवण्याकडे लक्ष दिले नाही पाहिजे, त्यांना जिथे लावायचे तिथे त्यांनी लावावे. तसेच राज ठाकरेंच्या भोंग्याच्या प्रस्तावाला आमचा विरोध आहे, असे ते म्हणाले.

पुढे आठवले म्हणाले, मनसेला भाजपमध्ये येण्याची गरज नाही. मनसेच्या सभेत जितकी गर्दी असते, ती गर्दी निवडणुकीत कुठे जाते, असा सवालही रामदास आठवले यांनी उपस्थित केला आहे. जसा उंच असतो ढोंगा, बरानाही भोंगा, असा टोला आठवलेंनी मनसेला लगावला आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी ईदपूर्वी मशिदीवरील भोंगे उतरवण्यास सांगितले आहे. अन्यथा, मशिदींसमोर हनुमान चालीसा लावली जाणार, असा इशार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version