‘वानखेडे कुटुंब मुस्लिम धर्मीय नाही तर आंबेडकरांचे अनुयायी’ – रामदास आठवले

‘वानखेडे कुटुंब मुस्लिम धर्मीय नाही तर आंबेडकरांचे अनुयायी’ – रामदास आठवले

  क्रुझवरील ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावर समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री  रामदास आठवले यांची भेट घेतली. दरम्यान समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंब हे मुस्लिम धर्मीय नसून बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असल्याची ग्वाही रामदास आठवलेंनी केली आहे.

  समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती  रेडकर, वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यावेळी वानखेडे कुटुंबीयाच्या भेटीनंतर रामदास आठवले यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी आठवलेंनी वानखेडे कुटुंबियांना पाठिंबा दिल्याचे दिसले. त्यावेळी समीर वानखेडे आणि त्याचे कुटुंबीय मुस्लिम धर्मीय नाही तर आंबेडकरांचे अनुयायी असल्याची प्रतिक्रिया रामदास आठवलेंनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली आहे.

  वानखेडे कुटुंबियांनी संबंधित सर्व कागदपत्रे पत्रकार परिषदेत समोर आणली. त्यामुळे समीर वानखेडे यांच्यावरील आरोप थांबवण्याचे आवाहनही रामदास आठवले यांनी नवाब मलिकांना केले आहे. तसेच नवाब मलिक हे मोठे नेते आहेत. ते दररोज वानखेडेंवर नवा आरोप करत आहेत. मात्र त्यांनी केले आरो आणि मांडलेले सर्व पुरावे खोटे असल्याचा दावा क्रांती रेडकरने केला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version