‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’ – नाना पटोले

‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’ – नाना पटोले

राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकारण चांगलेच तापले असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या ट्विटमुळे खळबळ उडाली आहे. ‘पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल’, असा दावा नाना पटोले यांनी ट्विटद्वारे केला आहे.

नाना पटोले यांनी ट्विट केले की, ‘२०२४च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वाधिक जागा मिळवणार असून पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असले.’ नाना पटोले यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

आज सकाळी नाना पटोले यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत ट्विट केले होते. ते म्हणाले, ‘राजस्थान, छत्तीसगढ राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे’, असे नाना पटोले म्हणाले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version