देशाला मिळाली नवी संसद

देशाला मिळाली नवी संसद

भारतीय लोकशाहीचे मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन रविवारी (२७ मे) वेदमंत्रांच्या घोषात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, ही वास्तू मोदी राष्ट्राला समर्पित करणार आहेत. काँग्रेससह २० विरोधी पक्षांच्या बहिष्काराचे सावट या सोहळ्यावर आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी त्यांच्या धक्कातंत्राचा अविष्कार रविवारीही घडवतील, असेही बोलले जात आहे.

नव्या संसद भवनाचे उद्घाटन वैदिक विधींनुसार होणार आहे. मोदी यांनी नवीन संसद संकुलाचा व्हिडीओही शेअर केला आणि ‘माय संसद माय प्राइड’ हॅशटॅग वापरून लोकांनी आपल्या ‘व्हॉइसओव्हर’सह हा व्हिडीओ शेअर करण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण दूरदर्शन, आकाशवाणी आणि सरकारचा पाठिंबा असलेल्या काही खासगी वाहिन्यांवरून करण्यात येईल. याच वेळी तमिळनाडूतून आणलेला विशेष राजदंड (सेंगोल) लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ स्थापित करण्यात येईल.

नवीन संसद भवन हे वास्तुकलेचा एक भव्य नमुना असून, त्याचा आतील भाग देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा प्रतिबिंबित करतो. ही इमारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याद्वारे संसद सदस्यांना अखंड ‘कनेक्टिव्हिटी’ प्रदान करण्यात येईल. नवीन संसद भवनात लोकसभेच्या आतील भागाची रचना राष्ट्रीय पक्षी मोरापासून, तर राज्यसभेची रचना राष्ट्रीय फूल कमळापासून प्रेरित आहेत. समिती कक्षात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संसद सदस्यांव्यतिरिक्त संशोधकांनाही नवीन संसद भवनाच्या ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. ही इमारत पर्यावरणपूरक असून, त्याला प्लॅटिनम दर्जा देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version