Tesla Model Y L इलेक्ट्रिक कारचं भारतात पदार्पण; 5 सेकंदात 100 चा वेग, जाणून घ्या ‘शोरूम’ किंमत

या नव्या मॉडेलमध्ये व्हीलबेस 3040 मिमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळते.
Tesla Model Y L इलेक्ट्रिक कारचं भारतात पदार्पण; 5 सेकंदात 100 चा वेग, जाणून घ्या ‘शोरूम’ किंमत

टेसला (Tesla) ने भारतात नवीन 6-सीटर इलेक्ट्रिक SUV Tesla Model Y L लॉन्च केली आहे. या नव्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 61.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही किंमत स्टँडर्ड Model Y पेक्षा सुमारे दोन लाख रुपयांनी जास्त आहे. लाँग व्हीलबेससह येणारी ही SUV विशेषतः अधिक जागा आणि लक्झरी शोधणाऱ्या ग्राहकांसाठी आणली आहे.

या नव्या मॉडेलमध्ये व्हीलबेस 3040 मिमीपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे केबिनमध्ये अधिक जागा मिळते. प्रथमच Model Y ला तीन रांगांच्या सीटिंगसह सादर करण्यात आले आहे, ज्यात 2+2+2 असे 6-सीटर लेआउट आहे. दुसऱ्या रांगेत कॅप्टन सीट्स, आरामदायी आर्मरेस्ट आणि तिसऱ्या रांगेतही चांगली जागा देण्यात आली आहे. याशिवाय मोठे बूट स्पेस आणि 116 लिटरचा फ्रंट ट्रंकही उपलब्ध आहे.

परफॉर्मन्सच्या बाबतीत Tesla Model Y L मध्ये ड्युअल मोटर ऑल-व्हील ड्राइव्ह सिस्टम देण्यात आली आहे. ही SUV अवघ्या 5 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग पकडू शकते. तिचा टॉप स्पीड 201 किमी प्रतितास आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार एका चार्जमध्ये तब्बल 681 किमीपर्यंत धावू शकते, जे लांब अंतर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठे आकर्षण ठरू शकते.

हेही वाचा: Malegaon Bomb Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींची निर्दोष मुक्तता; 37 निष्पापांचा गेला होता बळी

फीचर्सबाबत बोलायचे झाल्यास, या SUV मध्ये 16-इंच सेंट्रल टचस्क्रीन, 8-इंचची दुसरी स्क्रीन, 19 स्पीकर्सचा प्रीमियम साउंड सिस्टम, वायरलेस फोन चार्जिंग, एअर प्युरिफायर, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय ॲडॅप्टिव्ह सस्पेन्शन, सुधारित साउंड इन्सुलेशन आणि प्रीमियम इंटीरियरमुळे ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायी बनतो.

भारतामध्ये तीन रांगांच्या इलेक्ट्रिक SUV अजूनही कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यामुळे Tesla Model Y L ला प्रीमियम इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये वेगळी ओळख मिळू शकते. मात्र भारतातील 100 टक्के आयात शुल्कामुळे Tesla च्या गाड्या अजूनही तुलनेने महाग राहिल्या आहेत.

हेही वाचा: Solapur Crime News: कोवळ्या वयात लादलं मातृत्वाचं ओझं; 34 अल्पवयीन मातांची माहिती लपवली; डॉक्टरांसह नातेवाईकांवर कारवाई

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version